दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बेळगावच्या श्री दानम्मा मंदिरात ७ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर दरम्यान श्री दानम्मादेवी पुराणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविले जात आहेत.
गंदिगवाड येथील श्री मृत्युंजय स्वामी हिरेमठ यांची 7 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर या कालावधीत दररोज संध्याकाळी 5.30 ते 7 या वेळेत दानम्मादेवी मंदिर, शहापूर येथे श्री दानम्मादेवी पुराणाचे आयोजन केले आहे. तसेच विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होत आहेत. बुधवारी सकाळी आठ ते दहा या वेळेत कंकणबंधन कार्यक्रम झाला. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता पालिका मिरवणूक आणि 6.30 गोरज मुहूर्तावर श्री दानम्मादेवी आणि श्री सोमनाथाचे मंगलाचरण व अक्षतारोपण भव्यपणे पार पडले. यावेळी हजारो भाविक सहभागी झाले होते.
आमच्या इन न्यूज आपली मराठीसोबत बोलताना मंदिर समितीचे अध्यक्ष सी. एस. बेंबळगी म्हणाले की, आम्ही गेली ४६ वर्षे पुराण कार्यक्रम करत आहोत. आज बेळगाव शहर व परिसरातील गावातील हजारो भाविकांनी मंदिरात कंकणबंधन विधी केला आहे. भक्तांनी जो संकल्प केला तो देवीने पूर्ण करते त्यामुळे हा विधी करण्यात आला. वर्षानुवर्षे भाविकांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच 18 ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रम होणार असून भाविकांनी मंदिरात येऊन दानम्मादेवीचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.


Recent Comments