Belagavi

मुख्यमंत्र्यांच्या बेळगावदौऱ्यादरम्यान काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

Share

बैलहोंगलचे डीवायएसपी शिवानंद कटगी हे विविध प्रकरणांमध्ये दलितांना न्याय देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या बेळगावदौऱ्यादरम्यान त्यांना काळे झेंडे दाखवून घेराव घालण्यात येईल, असा इशारा दलित संघर्ष समितीचे अध्यक्ष रवी बस्तवाडकर यांनी दिला आहे.

बुधवारी बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही दलितांवरील अत्याचार संपले नाहीत. काही स्वार्थी, भ्रष्ट आणि जातीयवादी विचारसरणीच्या अधिकाऱ्यांकडून अस्पृश्यता, जातीय अत्याचार होत आहेत. बेळगावमधील विविध ठिकाणी दलितांवरील अत्याचार वाढले असून यावर सरकारने कोणतीही कारवाई केली नाही.

बैलहोंगलचे डीवायएसपी शिवानंद कटगी यांच्याकडूनही दलितांवरील अत्याचाराचे अनेक प्रकार घडले असून त्यांना तातडीने सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अन्यथा प्रभाकर कोरे यांच्या अमृत महोत्सवास येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

या पत्रकार परिषदेला दलित संघर्ष समिती भीमवाद संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

black-flag-display-for-cm-bommai-coming-to-belgaum-on-saturday-dalit-leader-ravi-bastawadkar-warns/