विजापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. राजकीय विरोधक एकाच सभेत दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भाजपचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ, माजी मंत्री अप्पासाहेब पट्टणशेट्टी हे एकमेकांचे अंतर्गत विरोधकही विजापुरात आज झालेल्या भाजपच्या बैठकीला उपस्थित होते. विजापूर येथील एका खासगी हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीचे नेतृत्व भाजपचे जिल्हाध्यक्ष आर. एस. पाटील-कूचबाळ यांनी केले. विजापूर महानगरपालिका निवडणुकीत कोणाला उमेदवारी द्यायची या मुद्द्यावर आमदारांची व उपस्थितांची मते जाणून घेण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी आणि मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.


Recent Comments