हंदीगनूर शिवाजी गल्ली शिवशाही युवक संघ यांच्या वतीने भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
हंदिगनूर गावातील शिवाजी गल्ली येथील शिवशाही युवक संघाच्या वतीने खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे व दुर्गा देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. केपीसीसी सदस्य मलगौड पाटील यांच्याहस्ते लक्ष्मी पूजन करण्यात आले. यानंतर राहुल जारकीहोळी यांच्याहस्ते फीत कापून स्पर्धेची सुरुवात झाली.

यावेळी बोलताना मलगौड पाटील बोलताना म्हणाले, व्यायामाशिवाय मनुष्याचे आयुष्य किड्यापेक्षाही वाईट असते. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या खेळात आवड असणे आवश्यक आहे. स्पर्धा म्हटलं की यश अपयश आलंच मात्र स्पर्धेतील सहभाग हा महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी न्यायदान कमिटीचे कल्लाप्पा कडोलकर, ग्रा . पं . उपाध्यक्षा अनिता चौगुले, ग्रापं सदस्य पुंडलिक पाटील, माधुरी पेटलं,, परशराम नाईक, हंदिगनूर ग्रापं अध्यक्ष सुरेश जाधव, भुजंग कडोलकर, महादेव पाटील, मारुती पाटील, गुरुनाथ पाटील, पी जी पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments