Accident

टायर फुटून बस उलटल्याने चालक ठार

Share

टायर फुटल्याने बस उलटून झालेल्या अपघातात बसखाली सापडून चालक जागीच ठार झाला. हा अपघात हुबळी तालुक्यातील शेरेवाड गावाजवळ झाला.

हुबळी तालुक्यातील शेरेवाड गावाजवळ टायर फुटल्याने केएसआरटीसी बस उलटली. यावेळी बसखाली आल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. KA 25 F 3097 क्रमांकाची ही बस लक्ष्मेश्वरहून हुबळीकडे निघाली होती. शेरेवाड गावाजवळ बस येताच अचानक टायर फुटल्याने बस उलटली.

बस उलटल्याने चालक बसखाली अडकला. बसमध्ये असलेले चार प्रवासी जखमी झाले असून जखमींना हुबळीतील किम्स इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

hubli ksrtc bus accident driver death