Belagavi

खानापूर येथे रक्तदान शिबीर

Share

खानापूर येथील उर्दू हायस्कूल येथे ईद-ए-मिलादच्या शुभ दिवशी अल-फलाह सोशल वेलफेअर अँड एज्युकेशन सोसायटी, बेळगाव आणि फ्रेंड्स सर्कल, खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

केएलई प्रभाकर कोरे रुग्णालयातील डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली जवळपास ८५ जणांनी रक्तदान केले. या कार्यक्रमात बोलताना उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक सलीम कित्तूर यांनी रक्तदानाच्या महत्वावर भर दिला आणि सर्व तरुणांना रक्तदान करण्यास प्रवृत्त केले आणि समाजाच्या हितासाठी अशी अनेक शिबिरे मोठ्या प्रमाणात घेण्याचा सल्ला दिला.

यावेळी प्रभागाचे नगरसेवक रफिक वारेमानी यांनी या शिबिरासाठी सहकार्य केले. अब्दुलखादर घीवाले यांनी हे शिबिर आयोजित करण्यात मोलाचा वाटा उचलला होता. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सद्दाम बडेघर, झाकीर बडेघर, शारुख पटेल, सय्यद हुसेन बडेघर, इसाक खान पठाण, परवेझ टेकडी, नियाज मुल्ला आदींनी परिश्रम घेतले.

Tags: