Belagavi

बेळगावात महर्षी वाल्मिकी जयंती थाटामाटात साजरी

Share

आद्य संत, रामायणकार महर्षी वाल्मिकी यांची जयंती बेळगावात आज मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.

होय, बेळगाव शहरातील जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत बेळगाव, बेळगाव महानगर पालीका आणि विविध खात्यांच्या संयुक्त विद्यमाने आज, रविवारी महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महर्षी वाल्मिकींच्या प्रतिमेची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

जिल्हाधिकारी नितेश पाटील, अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, कन्नड व सांस्कृतिक विभागाच्या सहायक संचालिका विद्यावती बजंत्री यांच्या हस्ते रथपूजन करून मिरवणुकीचे उदघाटन करण्यात आले. शहरातील किल्ला तलावापासून निघालेली ही मिरवणूक कुमार गंधर्व नाट्यगृहात संपली. यावेळी संपूर्ण मिरवणुकीत विविध वाद्ये वाजवण्यात आली. विविध लोककला पथकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता.

Tags:

belgaum valmiki jayanti