Belagavi

काकतीत मनोरुग्णाचा नग्नावस्थेत गोंधळ; डिवाइन हेल्पिंग हँड्सकडून मदत

Share

काकती लक्ष्मीनगर येथे एक मनोरुग्णाने नग्नावस्थेत गोंधळ घातला. याबाबत माहिती मिळताच डिवाइन हेल्पिंग हँड्स ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी त्याला पोलिसांच्या मदतीने सिव्हिल इस्पितळात दाखल करून उपचारांची सोय करवून दिली.

होय, काकती लक्ष्मीनगर येथे आज मानसिक स्थिती बिघडलेल्या एका व्यक्तीने नग्न अवस्थेमध्ये गोंधळ घातला. त्या भागातील महिलांनी व ग्रामपंचायत सदस्य मनोहर शेखरगोळ व सुहास लोहार यांनी डिवाइन हेल्पिंग हँड्स ग्रुपचे गजानन गव्हाणे यांना याची माहिती दिली गजानन गव्हाणे यांनी गटारीच्या पाण्यामध्ये झोपलेल्या त्या युवकाला पकडून त्याला आंघोळ घालून कपडे घालून पोलिसांना याची सूचना दिली व ॲम्बुलन्सला फोन करून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले. पायामध्ये काचा घुसल्याने व गटारीचे घाण पाणी पिल्यामुळे त्याची प्रकृती खालावली होती. बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या अनोळखी व्यक्तीवर उपचार सुरु आहेत.

काकती पोलीस स्टेशनचे पीएसआय मंजुनाथ हुलकुंद, व बीट पोलीस यल्लाप्पा मुरगट्टी यांनी सहकार्य केले सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करताना समाजसेवक अवधूत तुडवेकर यांनी मदत केली

Tags:

kakati mental patient admited in civil hospital