येडियुरप्पा यांच्यासोबत फिराल तर तुम्ही मुख्यमंत्रीच नव्हे तर आमदारही होऊ शकणार नाही असा टोला पंचमसाली आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा विजापुरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना लगावला आहे.

शुक्रवारी भाजप आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी मुडलगी तालुक्यातील कल्लोळी गावात पंचमसाली आरक्षण जनसंघर्ष मेळाव्याला संबोधित केले. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्र्यांना पंचमसाली समाजाला टु ए (2 A) आरक्षण देण्याच्या सूचना केल्याचं विधान केलं आहे. बोम्मयी यांनी स्वत: येडियुरप्पा यांना दौऱ्यावर नेले तर कर्नाटकात भाजपला फटका बसेल.
येडियुरप्पा यांनी परवा विधानसौधमध्ये पंचमसाली समाजाच्या विरोधात नसल्याचे सांगितले होते. मग त्यांनी पंचमसालीना आरक्षण का दिले नाही असा सवाल यत्नाळ यांनी केला. पाटील तुम्ही शांत रहा, तुम्हाला मंत्री करतो असे त्यांनी सर्वांना पाठवून मला सांगितले. त्यावर, बोम्मइ आता केवळ आणखी सहा महिने राहिलेत, आमच्या समाजाला 2A आरक्षण द्या असे मी सांगितले होते असे यत्नाळ यांनी सांगितले.
वाघाचा एक बछडा शेळ्या-मेंढ्यांसोबत राहून तसाच आवाज काढत असे. एके दिवशी वाघ आला आणि त्याने बछड्याला पाण्यात त्याचे प्रतिबिंब दाखवून म्हणाला, “तू वाघ आहेस, तेंव्हा बछड्याने वाघासारखी गर्जना केली. आता अरभावी मतदार संघातील पंचमसाली समाज जागा झाला आहे. आम्ही 2A आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही. आपल्या समाजाला घाबरण्याची गरज नाही. कुणाला बाबापुता म्हणण्याची गरज नाही. वाजपेयींशिवाय मी कोणाला बाप म्हटले नाही. पंचमसाली समाजाच्या दोघांना मंत्रिपद दिले आहे. कित्तूरमध्ये कोणीतरी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु करणार आहे म्हणे. आधी बेळगाव आणि हुबळीमध्ये कर बाबा, असे सांगत मंत्री मुरुगेश निरानी यांच्यावर यत्नाळ यांनी अप्रत्यक्ष हल्ला चढवला.
अलीकडेच, बेळगावातील काही स्वामीजींनी एका आमदाराच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात जाऊन त्याला त्यांचा उत्तराधिकारी म्हणून आशीर्वाद दिलाय असे सांगत अप्रत्यक्षपणे आ. सतीश जारकीहोळी आणि त्यांचे पुत्र राहुल यांच्यावर यत्नाळ यांनी टीका केली.
लिंगायत पंचमसाली पीठाचे बसवजय मृत्युंजय स्वामीजी, माजी मंत्री विनय कुलकर्णी, पंचमसाली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयानंद काशप्पनवर, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह पंचमसाली समाजाचे शेकडो लोक या मेळाव्यात सहभागी झाले होते.


Recent Comments