वाहन भाड्याच्या पैशाच्या आशेपोटी शहरातील कचरा आणून मोकळ्या परिसरात टाकणाऱ्या ट्रॅक्टरचालकांविरोधात माजी महापौर विजय मोरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटी रोडवरील शांताई वृद्धाश्रमाच्या शेजारी असलेल्या माळरानात कचरा आणून टाकणाऱ्या ट्रॅक्टर चालक व मालकांविरोधात माजी महापौर विजय मोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बेळगाव शहर हरित क्षेत्र आहे. ट्रॅक्टर व टेम्पे मालकांनी भाड्याने अशा प्रकारे बेळगाव शहराचे सौंदर्य बिघडवू नये. अशाप्रकारे कोणी कचरा टाकत असल्यास मला कळवावे, अशी विनंती त्यांनी जनतेला केली आहे.
माळरानावर कचरा टाकणाऱ्यांवर संबंधितानी कारवाई करावी, अशी मागणीही विजय मोरे यांनी केली आहे.


Recent Comments