Belagavi

बेळगावचा स्केटरर मास्टर अभिषेक नवलेचा तीन वेळा गिनीज रेकॉर्ड

Share

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 3 वेळा नाव नोंदवणारा बेळगावचा स्केटरर मास्टर अभिषेक नवले याचा बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

होय, बेळगावचा स्केटरर अभिषेक नवले याने तिसऱ्यांदा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश केला आहे. 5 ऑक्टोबर 2021 रोजी त्याने तिसऱ्यांदा आपले नाव नोंदवून एक उल्लेखनीय कामगिरी केली. यानिमित्त स्केटरर मास्टर अभिषेक नवले याचा आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बेळगावचे क्राईम विभागाचे एसीपी एस. आर. कट्टीमणी, अतिथी डॉ. सतीश चौलीगर, प्रकाश नेसरीकर, बुरुड गल्ली बेळगाव येथील श्री केतय्या मादार समाज अध्यक्ष लक्ष्मण बुरुड, बुरुड गल्ली श्री रेणुकादेवी व बिस्टादेवी मंदिर जीर्णोद्धार समितीचे गौतम लोंढे व इतर नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Tags:

belgaum sketer abhishek navale