डॉ. प्रभाकर कोरे हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून सर्वांपर्यंत शिक्षण आणि आरोग्य सेवा पोहोचविण्याचे कार्य करणाऱ्या डॉ. प्रभाकर कोरे यांचे कार्य कौतुकास्पद आहे अशी प्रतिक्रिया माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी व्यक्त केले.
आमदार अनिल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात पूर्वतयारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते. १५ ऑक्टोबर रोजी लिंगराज महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना आमदार अनिल बेनके यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, प्रल्हाद जोशी, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, जगदीश शेट्टर, ज्येष्ठ नेते शामनूर शिवशंकराप्पा, आर व्ही देशपांडे आणि अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बेळगावसह संपूर्ण उत्तर कर्नाटकातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक सहभागी होणार आहेत. अभूतपूर्व पद्धतीने कार्यक्रम यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीला आमदार अनिल बेनके, बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर, ज्योती महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य प्रा.अर्जुन घोरपडे, रणजीत चव्हाण-पाटील, माजी महापौर विजय मोरे, शिवाजी सुंठकर, बाळासाहेब काकतकर, मनोज पावशे, प्रदीप अधिकारी, कृष्णा हुंदरे, नारायण कीटवाडकर आदी उपस्थित होते.


Recent Comments