४ ऑक्टोबर हा जागतिक प्राणी दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने विविध संस्थांतर्फे प्राणी संवर्धनाबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
स्ट्रे केअर फाउंडेशन, बेळगाव ऍनिमल वेल्फेअर असोसिएशन, काकती येथील हा माझा धर्म, ऍनिमल फीडर्स ग्रुप या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने प्राणीप्रेमींनी मंगळवारी जागतिक प्राणी दिनानिमित्त प्राणी संवर्धनाबाबत जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. राणी चन्नम्मा सर्कल येथून या जनजागृती रॅलीची सुरुवात झाली. यानंतर लिंगराज कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, कॅम्प, रेल्वे ओव्हर ब्रिज, बसवेश्वर चौक, आरपीडी मार्गे गोगटे सर्कल येथे येऊन या रॅलीची सांगता झाली. यावेळी हातात फलक घेऊन पशु संवर्धनाबत जनजागृती करण्यात आली.
यावेळी बोलताना समाजसेवक प्रकाश पुजारी म्हणाले, या भूतलावर केवळ मनुष्यालाच राहण्याचा अधिकार नसून सर्व प्राणी, पक्षी आणि सर्व सजीवांना राहण्याचा अधिकार आहे. आधुनिकीकरण आणि विकासामुळे वन्यजीव नष्ट होत चालले असून फटाके, अटी ध्वनिप्रदूषण यामुळे प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. प्राण्यांवर देखील प्रत्येकाने प्रेम करून त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
आज मानवाने पृथ्वीवर असलेले अनेक प्राणी आणि नैसर्गिक घटक तसेच अनेक झाडे आणि वनस्पती नष्ट केल्या आहेत. अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत, तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या सर्वांबाबत ठोस पावले उचलली नाहीत, तर लवकरच पृथ्वीवरील मानवाचे जीवनही संपुष्टात येईल. अशा परिस्थितीत पृथ्वीवरील संतुलन राखण्यासाठी प्राणी व वनस्पती यांच्यात संतुलन राखणे आवश्यक आहे.


Recent Comments