Belagavi

फुलबाग गल्ली देवी दरबारला मीना बेनके यांची भेट

Share

फुलबाग गल्ली येथील स्वराज सेवा युवक मंडळ व राजमाता महिला मंडळ यांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त यंदा बेळगावच्या मानाच्या कुलस्वामिनी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. याठिकाणी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीना बेनके यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेऊन आरतीत भाग घेतला.

नवरात्रोत्सवानिमित्त बेळगाव शहर व उपनगरामध्ये विविध ठिकाणी दुर्गामातेची स्थापना करून दररोज महाआरती व दांडिया कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अशाच प्रकारे फुलबाग गल्ली येथील स्वराज सेवा युवक मंडळ व राजमाता महिला मंडळ यांच्या वतीने बेळगावची मानाची कुलस्वामिनी देवी स्थापन करून दररोज महाआरती व दांडिया कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीना अनिल बेनके यांनी देवी दरबाराला भेट देऊन दर्शन घेतले. त्यांच्या उपस्थितीमध्ये महाआरतीचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी बोलताना मीना अनिल बेनके म्हणाल्या की, गेली दोन वर्ष कोरोनामुळे साऱ्यांनाच संकटाला सामोरे जावे लागले , पण सुदैवाने आम्हा सर्वांना आता चांगले दिवस आले आहेत, याचा आनंद लुटणे व एकमेकांना मदत करणे व सुखी जीवन जगणे आवश्यक आहे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

अशाच प्रकारे शहरातील विश्वेश्वरय्या नगर येथे व बसवन कुडची येथील गणेश टेम्पल देवराज अर्स कॉलनी येथेही दररोज महाआरती, दांडियासह इतर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या साऱ्या कार्यक्रमांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

Tags:

navratri festival celebrated in fulbag galli