Belagavi

हलगा येथील हजारो शिवभक्तांची जल्लोषात दौड

Share

हलगा येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडमध्ये हजारो संख्येने शिवभक्त सहभागी होत आहेत.

हलगा येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेतर्फे वीस वर्ष निरंतर चालणारी बेळगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील पहिलीच दौड म्हणावी लागेल. हलगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ शिवाजी महाराज पुतळ्याची पूजा करून या दौडीला सुरुवात करण्यात आली. इंडियन आर्मी जवान असलेले कुमार प्रतीक संताजी व उमेश बिळगोजी, नागेश संताजी यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करून दौड मार्गस्थ झाली, वेगवेगळ्या भागांमध्ये दौडचा संचार झाला. ठिकठिकाणी दौडीचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले.

दौडीच्या मार्गावर सजीव देखावा सादर करण्यात आला. त्यातील शिवाजी महाराजांच्या व मावळ्यांच्या वेशभूषेतील धारकरी दौडीचे खास आकर्षण ठरले. छत्रपती शिवाजी महाराज, भारतमाता आणि हिंदू धर्माचा जयजयकार करत तरुणांनी सळसळत्या उत्साहात दौडमध्ये जल्लोषाने भाग घेतला. हलगा येथील भावकाई मंदिर येथे दौड आल्यानंतर प्रेरणा मंत्र झाल्यानंतर लक्ष्मण मोरे यांच्या हस्ते ध्वज उतरून सांगता करण्यात आली.

Tags:

belgaum halaga shri durgamata doud