Belagavi

समर्थनगरमध्ये भवानी मातेचे जिल्हाधिकाऱ्यांकडून सपत्नीक दर्शन

Share

बेळगाव येथील समर्थनगर येथील तरुण मंडळाने आयोजित केलेल्या भवानी माता पूजन कार्यक्रमात जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सपत्नीक सहभागी होऊन भवानी मातेचे दर्शन घेतले.

समर्थनगर, बेळगाव येथे नवरात्रोत्सवानिमित्त समर्थनगर तरुण मंडळ आणि सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळातर्फे भवानी माता विशेष पूजा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पूजेच्या कार्यक्रमादरम्यान बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सहपरिवार देवीचे दर्शन घेतले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दाम्पत्यासह भवानी मातेची आरती केली.

यावेळी समर्थनगर तरुण मंडळातर्फे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा सुनील कणेरी यांच्या हस्ते व त्यांच्या पत्नीचा स्थानिक महिलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गल्लीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

dc-couple-worshiped to bhavanimata