Belagavi

भारत जोडो पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर पूर्वनियोजन बैठक

Share

काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारत जोडो पदयात्रेचे आगमन अथणी येथे होणार असून या पार्श्वभूमीवर अथणी शहरातील काँग्रेस कार्यालयात पूर्वतयारीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी बोलताना काँग्रेसचे चिकोडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या भारत जोडो पदयात्रेला जनतेचा अभूतपूर्व पाठिंबा मिळत आहे. जनता काँग्रेसला पसंती दर्शवत असून राज्यात आयोजित करण्यात आलेल्या सिद्धरामोत्सव कार्यक्रमाहून अधिक प्रतिसाद जनता पदयात्रेला देत आहे. रिमझिम पावसातदेखील एकही नेत्याने छत्री न वापरता जनतेला संबोधित केले मात्र जनतेने देखील एका जागेवरून न हलता भाषण ऐकले, यावरूनच काँग्रेसच्या वाढत्या पाठिंब्याची अनुभूती मिळत असलयाचे ते म्हणाले. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष प्रचंड बहुमत मिळवून सरकार स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

राकेश मैगुर, आपली मराठी, अथणी

Tags: