Belagavi

ईद मिलाद निमित्त बेळगावात खाद्य महोत्सव

Share

बेळगावच्या अंजुमन संस्थेतर्फे ईद मिलाद सणानिमित्त खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष राजू सेठ यांनी दिली आहे.

सोमवारी शहरातील अंजुमन कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना राजू सेठ यांनी सांगितले की, अंजुमन-ए-इस्लाम संस्था शैक्षणिक व सामाजिक सेवा देत आहेत. त्याचप्रमाणे, कोविडच्या बाबतीत आम्ही कोणतीही जात, धर्म असा भेद न पाहता लोकांना मदत करण्याचे काम केले आहे. बेळगाव हे विविध जाती, भाषा, धर्माचे लोक असलेले अनोखे शहर आहे. इथे अंजुमन संस्थेचा सगळ्यांशी अतिशय अतूट संबंध आहे. आता ईद मिलादच्या निमित्ताने अंजुमन संस्थेच्या परिसरात 4 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर असे 11 दिवस खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. यामध्ये सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केली.

पत्रकार परिषदेला सलीम माडीवाले, मतीन शेखअली, अब्दुल गफार घीवाले आदी उपस्थित होते.

Tags:

belgaum food festival