हिंदू धर्मात नवरात्रोत्सवाला विशेष महत्व आहे. नवरात्रीनिमित्त ९ दिवस ९ विविध स्वरूपात, देवीच्या विविध ९ रूपात वेशभूषा करून बेळगावमधील युवतीने मोबाईलच्या विळख्यात अडकलेल्या तरुणाईला सणांचे महत्व पटवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
आदिशक्तीची वेशभूषा… डोक्यावर मुकुट आणि हातात त्रिशूळ.. या आदिशक्तीच्या रूपात साक्षात देवीच अवतरल्याचा भास या तरुणीकडे पाहून होत आहे. या तरुणीचे नाव आहे प्रिया सवदी. २१ वर्षीय प्रिया हि बेळगावच्या विविध मंदिरांमध्ये अशा वेशभूषेत जाऊन धार्मिक जागृती करत आहे. अनेक भाविक या तरुणींसमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद देखील घेत आहेत….
याबाबत आपली मराठीला प्रतिक्रिया देताना प्रिया सवदी या तरुणीने सांगितले, तरुणांमध्ये हल्ली पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण अधिक केले जात आहे. यामुळे भारतीय संस्कृतीचा विसर पडत आहे. नवरात्रोत्सवानिमित्त ९ दिवस विविध धार्मिक विधी साजऱ्या होतात. नवरात्री हि केवळ दांडिया नृत्य करण्यासाठी नसून नवरात्रोत्सवाचे वैशिष्ट्य काय आहे याची माहिती तरुणाईपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण जागृती करत असल्याचे प्रियाने सांगितले.
भारतीय संस्कृतीचे विशेष असे वैशिष्ट्य आहे. परंतु अलीकडे पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण अधिक होत चालले आहे. हल्लीच्या तरुणाईने आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन करावे, यासाठी आपण जनजागृती करण्याचा छोटासा प्रयत्न करत असल्याचे या तरुणीने सांगितले .


Recent Comments