Vijayapura

हिंदू संघटनांच्या महिलांची विजापुरात दुर्गामाता दौड : लव्ह जिहादबाबत इशारा

Share

हिंदू संघटनांच्या महिला नेत्या आणि कार्यकर्त्यांच्या वतीने विजापुरात आज दुर्गामाता दौड काढण्यात आली. यावेळी लव्ह जिहादबाबत कडक इशारा देण्यात आला.

विजापूर शहरातील सिध्देश्वर मंदिरपासून छत्रपती शिवाजी सर्कलपर्यंत विजापूर शहरातील हिंदू संघटनांच्या महिला नेत्या आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आज नवरात्रानिमित्त दुर्गामाता दौड काढण्यात आली. शहरातील महत्त्वाच्या भागात पदयात्रा काढून धार्मिक जागृती करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन हिंदू संघटनेच्या महिला नेत्यांनी केले होते. दौडमध्ये भगवा ध्वज व तलवार हाती घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी धार्मिक जनजागृती करण्यात आली. लव्ह जिहादबाबत आक्रोश व्यक्त करून तरुणींना लव्ह जिहादबाबत सावध राहण्याचा इशारा देण्यात आला. देशात लव्ह जिहाद वाढला आहे. दोन लाख लव्ह जिहाद प्रकरणे समोर आली आहेत. तरुण हिंदू महिलांनी याबाबत सावध रहावे अशी जागृती करण्यात आली.

दिशा फाऊंडेशनच्या नेत्या मंचलेश्वरी यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली. शिवप्रतिष्ठान महाराष्ट्रचे सिदगोंडा मल्लाप्पा गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गा दौड कार्यक्रम संपन्न झाला.

Tags: