ब्रेक फेल झाल्याने खासगी बस कंपाउंड तोडून पोलिस विभागाच्या जागेत घुसल्याची घटना बेळगाव शहरातील आरटीओ सर्कलमध्ये आज घडली.
होय, बेळगावमधील आरटीओ सर्कलजवळ एक खासगी बसमध्ये बिघाड झाला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून रिकाम्या इमारतीच्या कंपाऊंडमध्ये घुसली. यावेळी बसमध्ये प्रवासी नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.


आज सकाळी चन्नम्मा सर्कलकडून येताना या खासगी बसचा ब्रेक फेल झाला. खासगी बसच्या चालकाने प्रसंगावधान राखून जवळच असलेले हनुमान मंदिर टाळून बस एका रिकाम्या इमारतीच्या कम्पाउंडवर धडकली. या धडकेमुळे बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. मार्केट पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. सकाळच्या वेळी या रस्त्यावर पादचारी आणि वाहनांची फारशी वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला.
यावेळी तेथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींना ही घटना पाहून धक्काच बसला. घटनेबाबत बोलताना एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, चन्नम्मा सर्कलकडून बस या दिशेने येत होती. यावेळी बसचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाने सुरक्षेच्या कारणास्तव बाजूच्या रिकाम्या जागेत प्रवेश केला. बसमध्ये कोणीच नव्हते त्यामुळे धोका टळला. बसच्या पुढील भागाचे थोडे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रेक निकामी झालेली ही खाजगी बस शेजारील हनुमान मंदिराला धडकली असती तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. मात्र चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला.


Recent Comments