बेळगाव शहरात दसरा उत्सवानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित दुर्गामाता दौड सोहळा आज सातव्या दिवशीही मोठ्या थाटामाटात पार पडला. शहराच्या दक्षिण भागात काढलेल्या या दौडीचे शहापूर बसवण गल्ली परिसरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

दसरा उत्सवाच्या सातव्या दिवशी आज रविवारी पहाटे नाथ पै चौक जवळील अंबाबाई मंदिरात पूजन करून ध्वज चढवून दौडीला प्रारंभ करण्यात आला. बसवण गल्ली, शहापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून दौडीचे नागरिकांनी भव्य स्वागत केले. यावेळी तरुण-तरुणींनी पारंपरिक पांढरे कपडे परिधान करून दौडमध्ये सहभाग घेतला. यावेळी धार्मिक ध्वज घेऊन ध्वजवाहक पुढे सरकत असतानाच तरुण-तरुणींनी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून दौडमध्ये सहभाग घेतला. दौडीच्या मार्गावर ठिकठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे भव्य प्रदर्शन घडविण्यात आले. यावेळी लहान मुलांनी शिवाजी महाराज व जिजामातेची वेशभूषा करून दौडमध्ये लक्ष वेधून घेतले.
श्री राम सेना हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी दौडसंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, गेल्या २५ वर्षांपासून बेळगावमधील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दुर्गामाता दौड काढण्यात येत आहे. आजच्या तरुणांना आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी या उद्देशाने ही दौड काढली जाते. आजच्या तरुण-तरुणींनी आपली संस्कृती जाणून घेतली पाहिजे. यातून देशभक्तीची भावना वाढीला लागेल. त्यामुळे सर्व नागरिकांनी दौडमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. बाइट
यावेळी गीता उंडाळे यांनी सांगितले की, मी गेल्या १५ वर्षांपासून दौड काढलेली पाहत आहे. खूप छान चालले आहे. मुले रात्रभर तयारी करतात आणि हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करतात. सर्वांनी संघटित व्हावे. हिंदू धर्माचे महत्त्व सर्वांना कळले पाहिजे. त्यामुळे ही दौड काढली जात असल्याचे त्यांनी सांगितले. बाइट
यावेळी वैभव खाडे आणि जान्हवी कालकुंद्री यांनी सांगितले की, आम्ही अनेक वर्षांपासून दौडमध्ये सहभागी होत आहोत. यावेळी प्रत्येक गल्लीबोळात दौडचे स्वागत करण्यात येत आहे. मुली रांगोळी घालतात तर तरुण-तरुणी दौडमध्ये सहभागी होतात. यावेळी सर्वांनी दौडमध्ये सहभागी होऊन हिंदू धर्माची माहिती घ्यावी. आम्ही बर्याच वर्षांपासून दौडमध्ये सहभागी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण खूप आदर करतो. त्यामुळेच आम्ही या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी हजारो तरुण-तरुणींनी सळसळत्या उत्साहाने दुर्गामाता दौडमध्ये भाग घेतला. शिवाजी महाराजांचा जयजयकार करत घोषणा देताना धारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहात होता.


Recent Comments