काकती गावात दुर्गामाता दौड काढताना काही स्थानिक लोकांनी कन्नड ध्वजाचा अपमान केल्याची आवई उठवल्याने काही काळ तणाव निर्माण झाल्याची घटना घडली.
होय, बेळगाव तालुक्यातील काकती गावात दुर्गामाता दौड उत्सवादरम्यान तेथील स्थानिकांनी कन्नड ध्वज फडकावला होता. यावेळी एकाने विशिष्ट ध्वज न लावता हिंदू धर्माचा भगवा ध्वज लावण्यास सांगितले. विशिष्ट समुदायाचा झेंडा लावल्यास तिथे दौड येणार नाही असे सांगितले. त्यानंतर दुर्गामाता दौड त्या ठिकाणी गेली नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. तेथे उपस्थित असलेल्या काहींनी या घटनेचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओतील कन्नडप्रेमी युवकाने याबाबत माहिती दिली.
वास्तविक कुठली भाषा, संस्कृती असा भेद न करता हिंदुत्वाच्या रक्षणासाठी देव, देश आणि धर्माच्या संरक्षणाच्या उद्देशाने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे नवरात्रात दुर्गामाता दौड काढण्यात येते. पण या मूळ तत्वालाच हरताळ फासून आपला भाषेचा झेंडा लावून दुराभिमान दाखविणाऱ्या मूठभर कानडी पुंडांचा काकती गावात निषेध करण्यात आला.


Recent Comments