Belagavi

राज्यातील ३५००० देवस्थानात कुंकुमार्चन विधी : शशिकला जोल्ले

Share

लोककल्याणासाठी राज्यातील सुमारे ३५००० देवस्थानांमध्ये कुंकुमार्चन विधीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली.

व्हॉइस : निपाणी येथील जोल्ले पब्लिक स्कुल प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या नवरात्री विशेष कुंकुमार्चन कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्या बोलत होत्या. धर्मादाय खात्याच्यावतीने लोककल्याणासाठी राज्यातील सुमारे ३५००० देवस्थानात कुंकुमार्चन विधी आयोजित करण्यात आल्याची माहिती मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली. निपाणीतील ११००० महिला यात सहभागी होणार असून आपल्यासाठी हि अत्यंत आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सर्व जनतेला त्यांनी नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

सदर कुंकुमार्चन विधीसाठी कोल्हापूर श्री महालक्ष्मी अंबाबाईचे पुजारी उपस्थित होते. विशेष मंत्रपठणाच्या माध्यमातून कुंकुमार्चन विधी संपन्न झाला. यावेळी निपाणी येथील सुमारे १०००० महिलांनी यावेळी सहभाग घेतला होता. यावेळी पावसाने हजेरी लावूनही महिलावर्गाची उपस्थिती मोठी होती.

यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले, हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत कोटीवाले, सिद्दू नराटे, नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा नीता बागडे, नगरसभा सदस्य आणि भाजपचे कार्यकर्तेही उपस्थित होते.

Tags:

shashikala jolle kumkumarchane