आदिशक्तीच्या नवरात्रौत्सवानिमित्त बेळगावात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने काढण्यात येत असलेल्या दुर्गामाता दौडीला आज सहाव्या दिवशीही प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहराच्या मध्यवर्ती आणि बाजारपेठ भागातून काढलेल्या दौडीमुळे नवचैतन्याचे सळसळते वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळाले.
होय, देव,देश अन धर्माच्या रक्षणाची आस मनी बाळगून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे हजारो धारकरी आज सहाव्या दिवशीच्या दुर्गामाता दौडीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. पंधे शुभ्र कपडे, टोप्या आणि भगवे फेटे परिधान करून सहभागी झालेल्या युवक-युवतींचा दौडीमधील सळसळत्या उत्साहाने सहभाग वाखाणण्याजोगा होता. धर्मध्वज हाती घेतलेला धारकरी युवक दौडच्या अग्रभागी होता. त्या पाठोपाठ शिस्तबद्धरीत्या युवक-युवती धावत जात होते. गल्लो गल्ली छत्रपती शिवरायांचे वीररसयुक्त पोवाडे, देशभक्तीपर गीते स्पीकरवर लावण्यात आली होती.
अनेक गल्ल्यांत बाल शिवरायांची, जिजामातेची वेशभूषा केलेली चिमुकली मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. त्याशिवाय आकर्षक सजावटीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवरायांच्या, आई भवानीच्या पुतळ्यांचे पूजन करण्यात आले होते. त्यामुळे जणू काही शिवसृष्टीच साकारल्याचा भास होत होता. आजची सहाव्या दिवशीची दौड पांगुळ गल्ली, आझाद गल्ली, मेणसी गल्ली, भेंडीबाजार चौक आदी मध्यवर्ती आणि बाजारपेठ भागातून काढण्यात आली. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून, सुबक रांगोळ्या रेखाटून दौडीचे स्वागत करण्यात आले.

या संदर्भात प्रतिक्रिया देताना आझाद गल्लीच्या रहिवासी राजश्री राजपूत यांनी सांगितले की, गेली अनेक वर्षे मी या भागात राहते. दरवर्षी दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. स्त्री शक्तीचे प्रतीक असलेल्या आदिशक्ती दुर्गामातेच्या नावाने काढण्यात येणाऱ्या या दौडीमुळे बेळगाव शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण होते. यामुळे युवकांना शिस्त लागते. दरवर्षी दौडला वाढत प्रतिसाद लाभतोय. नवी मुले युवक उत्स्फूर्त उत्साहाने सहभागी होतात. याचे समाधान आहे असे त्यांनी सांगितले. बाईट
किशोरवयीन संस्कार गायकवाड आणि काही महिलांनी सांगितले की, दुर्गामाता दौडमुळे बेळगावात एक चैतन्यमय वातावरण नवरात्रात निर्माण होते. दौड पाहून, त्यात सहभागी होऊन मनाला एक इग्लेच समाधान लाभते.
दरम्यान दौडच्या मार्गावर ठिकठिकाणी कमानी बांधून, त्याला भगवे फेटे,कपडे बांधण्यात आले होते. रस्त्याच्या दुतर्फा आणि इमारतींवरून पुष्पवृष्टी करून दौडचे स्वागत करण्यात येत होते. महिलांनी मार्गावर सुबक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. धर्मध्वजासमोर कलशातून पाणी ओतून आरती करून स्वागत करण्यात आले. श्रीराम सेना-हिंदुस्थानचे संस्थापक रमाकांत कोंडुसकर व कार्यकर्ते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्यासह हजारो कार्यकर्ते, युवक-युवती दौडमध्ये सहभागी झाले होते.


Recent Comments