Belagavi

क्रेडाई बेल्कॉन प्रॉपर्टी एक्स्पोचे शानदार उदघाटन

Share

दरम्यान, आज सायंकाळी मराठा मंदिरात एका शानदार समारंभात क्रेडाई बेल्कॉन प्रॉपर्टी एक्स्पोचे मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले. यावेळी बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील, स्टेट बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी जनरल मॅनेजर मनीष चंद्र प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


प्रदर्शनाचे उदघाटन केल्यानंतर बोलताना आ. अभय पाटील यांनी सर्व बिल्डर्सना सरकार, महापालिका आणि संबंधित खाती, संस्थांचे बांधकाम विषयक नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले. अनेक बिल्डर्स नियम न पाळता बांधकामे करत आहेत. अशांवर कारवाई होणार हे निश्चित असते. त्यामुळे सर्व बांधकाम व्यावसायिकांनी नियम पाळून बांधकामे करावीत असे आवाहन आ. अभय पाटील यांनी केले.

यावेळी बोलताना स्टेट बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी जनरल मॅनेजर मनीष चंद्र म्हणाले, बांधकाम क्षेत्रात अनेक आविष्कार बदल होत आहेत. त्यांची दखल घेऊन बिल्डर्सनी ग्राहकांना परवडेल अशा दरात उच्च दर्जाची घरे, फ्लॅट्स उपलब्ध करून दिली पाहिजेत. त्याचप्रमाणे सरकारी नियमांचे पालन करून व्यवसाय करावा असे आवाहन मनीष चंद्र यांनी केले.

यावेळी क्रेडाई बेल्कॉन प्रॉपर्टी एक्स्पोचे प्रायोजक बालाजी कॉंक्रिटस, जीएम इलेक्ट्रिकल्स तसेच अन्य स्पॉन्सर्स, आयोजक यश इव्हेंट्स व यश कम्युनिकेशनचे संचालक प्रकाश कालकुंद्रीकर आदींचा सन्मान करण्यात आला. यावेळी बेळगाव परिसरातील बिल्डर्स तसेच बांधकाम क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

belgaum belcon credai