कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या चडचण तालुक्यातील धुळखेड आरटीओ चेक पोस्टवर लोकायुक्तांनी आज पहाटेच्या सुमारास छापा टाकला.

धुळखेड चेकपोस्टवर वाहतूकदार वाहनधारकांकडून पैसे वसूल केले जात असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर लोकायुक्त एसपी अनिता हदन्नावर यांच्या नेतृत्वाखालील सुमारे 20 अधिकाऱ्यांच्या पथकाने या चेकपोस्टवर आज शुक्रवारी पहाटे 5 वाजता छापा टाकून तपास सुरु केला आहे. ही टीम आरटीओ चेकपोस्टवर कागदपत्रांची पडताळणी करत असून सर्व गैरप्रकारांची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या या टीममध्ये डीवायएसपी अरुण नायक, पुष्पलता, महेंद्र नायक, आनंदा डोणी, आनंद ठक्कनवर यांच्यासह 20 हून अधिक अधिकारी यांचा समावेश आहे. सुमारे 8-10 होमगार्ड कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन कागदपत्रांची छाननी करून चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.


Recent Comments