Vijayapura

मुख्यमंत्र्यांकडून आलमट्टी जलाशयात गंगा पूजन

Share

विजापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज निडगुंदी तालुक्यातील आलमट्टी येथील लालबहादूर शास्त्री जलाशयाचे गंगा पूजन केले.

हुबळीहून हेलिकॉप्टरने आल्यानंतर त्यांनी अलमट्टी येथील लाल बहादूर शास्त्री जलाशय येथे जाऊन कृष्णा नदीचे गंगापूजन केले. यावेळी पाटबंधारे मंत्री गोविंद कारजोळ, मुद्देबिहाळचे आमदार एस. एस. पाटील नडहळ्ळी, विजापूरचे खासदार रमेश जिगजिनगी, माजी मंत्री अप्पू पट्टणशेट्टी, कर्नाटक बियाणे मानक संस्थेचे अध्यक्ष विजुगौडा पाटील, माजी मंत्री संगन्ना के. बेलुब्बी, भाजपचे विधानपरिषद सदस्य पी. एच. पुजार, भाजप विजापूर जिल्हाध्यक्ष आर. एस. पाटील-कुचाबाळ, भाजप नेते राजेंद्र वाली, अप्पुगौडा पाटील मनगुळी आदी यावेळी उपस्थित होते.

Tags:

cm bommai ganga puje