Belagavi

सेंट जर्मेन इंडियन हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन

Share

बोलेल ते ऐकणारा रोबोट, पाणी शुद्धीकरण संयंत्र, बागशेती असे नाना प्रकल्प आपल्या प्रगल्भ कल्पनाशक्ती आणि गुरुजनांचा मार्गदर्शनाखाली विध्यार्थ्यानी साकारले. निमित्त होते, बेळगावच्या सेंट जर्मेन इंडियन हायस्कूलमधील विज्ञान प्रदर्शनाचे ! विध्यार्थ्याच्या सुप्त प्रतिभा आणि कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी याचे आयोजन केले होते.

होय, भडकल गल्ली, बेळगाव येथील सेंट जर्मेन इंडियन हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता वाढविण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्ष उदय इडगल, प्राचार्या वंदना मांजरेकर, मुख्याध्यापिका सौ.जुबेरा पटेल, महिला बीएड महाविद्यालयाच्या प्राचार्या जोशी, विज्ञान केंद्राचे सचिव राजशेखर पाटील, केएलई बीएड महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. अनिता दोडामणी, डॉ. गिरीजा कडेन्नावर उपस्थित होत्या. विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून रझिया मुनूर आणि शिवानंद कलकोड यांचे आगमन झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रिबन कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला संबोधित करताना संस्थेचे अध्यक्ष उदय इडगल म्हणाले की, आज आमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. एलकेजी ते 10वी पर्यंतच्या सुमारे 200 विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सहभाग घेतला. विविध प्रकारचे मॉडेल्स बनवले. पालकांनी हा कार्यक्रम बघून आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यावे. या प्रकारचे कार्यक्रम मुलांची कार्यक्षमता सुधारतात. त्यामुळे आमच्या शाळा व्यवस्थापन मंडळाच्या सहकार्याने अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

वंदना मांजरेकर म्हणाल्या, आम्ही आमच्या शाळेत आज या शैक्षणिक वर्षासाठी विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे. या कामासाठी शाळा व्यवस्थापन मंडळ व पालकांनी खूप सहकार्य केले आहे. त्यामुळे ही सर्व तयारी मुलांनीच केली होती. वेस्ट फ्रॉम द बेस्ट या थीमवर आधारित हे प्रदर्शन भरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शालेय मुलांनी या विज्ञान प्रदर्शनात मोठ्या आवडीने भाग घेतला. कुणी सांगेल ते ऐकणारा रोबोट बनविला, तर कुणी पाणी शुद्धीकरण संयंत्र, कुणी वृक्षांची जीवरचना तर कुणी बागशेतीचे मॉडेल अशा विविध प्रकल्पांचे आपल्या प्रतिभा-कल्पनाशक्तीच्या बळावर आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली सादरीकरण केले. पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांची ही कामगिरी पाहून मुलांना शाबासकी दिली.

Tags:

belgaum germainschool science exhibhition