Belagavi

बेळगावात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची निदर्शने

Share

राज्यात ऊस कारखाने सुरू होत असून, उसाचा भावही ठरवावा. उसाला 3500 रुपये प्रतिटन भाव द्यावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

राज्यात ऊसाचा हंगाम सुरू होत आहे. आता ऊस तोडणी हंगाम सुरू करण्यासाठी ऊस कारखानदारांची तयारी सुरू आहे. त्यामुळे यावेळी उसाच्या भावात वाढ करण्यात यावी या मागणीसाठी बेळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यांतील शेतकरी व शेतकरी नेत्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल दर निश्चित करून न्याय द्यावा अशी मागणी केली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शेतकरी नेते चुनप्पा पुजारी म्हणाले की, आज 14 तालुक्यांतील सर्व शेतकरी नेते येथे आले आहेत. या ऊस तोडणी हंगामाची सर्वच कारखाने तयारी करत आहेत. त्यामुळे यावेळी उसासाठी 3500 रुपये प्रतिटन दर निश्चित करूनच कारखाने सुरू करावेत. शेतकऱ्यांच्या जमिनींना हेस्कॉम रात्री सिंचनासाठी वीज देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.

कारखानदार आणि हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना बोलावून सुवर्णसौध येथे बैठक घेणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, मात्र, येथे आम्हाला न्याय मिळणार नाही, अशी भीती आहे. त्यामुळे येत्या 10 तारखेला विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह एकत्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, असा इशारा त्यांनी दिला.

बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेले शेतकरी नेते व शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Tags:

dc memo farmers farmers sangh dc memo