Belagavi

विद्या आधार : आर्थिक अडचणीतील विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य

Share

बेळगावमध्ये विद्या आधार एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने आर्थिक अडचणीत असलेल्या १० विद्यार्थ्यांना ६० हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य करण्यात आले.

पालिका आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ, भरतेश एज्युकेशन सोसायटीचे डॉ. राजीव दोड्डन्नावर, सामाजिक कार्यकर्ते व माजी महापौर विजय मोरे, पर्यावरण विकास अधिकारी एच. जगदीश, विद्या आधार संस्थेचे संतोष ममदापुर, अलन मोरे, श्रीपाद खेमलापूर, राजेश रामगोंड, योगिता पाटील यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत निधीचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला उद्देशून बोलताना एच जगदीश यांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिकबाबत जनजागृतीपर विचार व्यक्त केले. आधुनिक युगातील प्लास्टिक वापराबद्दलही त्यांनी माहिती देत सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले.

यावेळी डॉ. संजय डुमगोळ यांनी विजय मोरे यांनी कोविडकाळात बजाविलेल्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या समाजसेवेबद्दल उपस्थितांना माहिती दिली.

 

विजय मोरे बोलताना म्हणाले, समाजातील वंचित असलेल्या मुलांच्या शिक्षण प्रोत्साहन देण्यासाठी विद्या आधार एज्युकेशन संस्था कार्यरत आहे. आतापर्यंत ४५० विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली आहे. या ४५० विद्यार्थ्यांपैकी २ डॉक्टर आहेत तर अनेक विद्यार्थी सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत. राजू दोड्डण्णावर यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

आर्थिक अडचणीत असलेल्या १० विद्यार्थ्यांना यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आर्थिक निधी सुपूर्द करण्यात आला.

 

यावेळी भरतेश एज्युकेशन सोसायटीचे डॉ. राजीव दोड्डाण्णावर, विजय मोरे, पर्यावरण विकास अधिकारी एच. जगदीश, विद्या आधार संस्थेचे संतोष ममदापुर, अलन मोरे, श्रीपाद खेमलापूर, राजेश रामगोंड, योगिता पाटील यासं अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags:

vidhya aadhar yojana