दसरा म्हटले की अनेकांना फक्त म्हैसूरचा दसराच आठवतो. पण विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील तांबा गावातही दसरा तितक्याच भव्यपणे आणि उत्साहात साजरा केला जातो. हा ग्रामीण दसरा, लोक दसरा, उत्तर कर्नाटकातील दसरा या नावाने प्रसिद्ध आहे.

तांबा गावात नवरात्रोत्सवाचा एक भाग म्हणून काढलेल्या लोककला पथकांसह मिरवणुकीने हजारो लोकांचे लक्ष वेधून घेतले. तांबा गावातील अंबाभवानी एज्युकेशन ट्रस्ट आणि जगदंबा विद्यावर्धक संघ आणि तांब्याची जनता यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा महोत्सवाचे आयोजन केले आहे. यात राज्यातील कला पथकांनी सहभाग घेतला. उत्सवाचा एक भाग म्हणून गावात भुवनेश्वरी देवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. 2001 सुवासिनींनी डोक्यावर कुंभ घेऊन मिरवणुकीत समभाग घेतला.
महिलांचे, मोर आणि घोड्याचे नृत्य, लेझीम मेळा, लोकनृत्य व सृष्टी आर्ट्स यक्षगान, बँड कंपनीचे बँड वादन, भव्य उत्सव मूर्तींचे सादरीकरण, हत्ती, डीजे साऊंड सिस्टीमने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. विजापूरचे जिल्हाधिकारी विजयमहांतेश दानम्मानवर यांच्या हस्ते या भव्य दसरा महोत्सवाचे उद्घाटन झाले. आमदार देवानंद चव्हाण यांच्यासह स्वामीजी आणि हजारो भाविकांनी हा उत्सव पाहिला.


Recent Comments