Belagavi

टीव्हीएस कंपनीच्या नवीन Bikeronin 225cc बाईकचे अनावरण

Share

खास दसरा – दिवाळी सणानिमित्त टीव्हीएस कंपनीने दुचाकीस्वारांसाठी नवीन बाईक लाँच केली आहे.

एसीपी नारायण बरमनी आणि उद्योगपती हेमेंद्र पोरवाल यांनी आज बेळगावातील हायटेक टीव्हीएस शोरूममध्ये टीव्हीएस कंपनीच्या नवीन Bikeronin 225cc बाईकचे अनावरण केले. दसरा दिवाळी सणानिमित्त आलेले हे वाहन दुचाकीप्रेमींसाठी आकर्षण ठरत आहे. अनावरणप्रसंगी बोलताना एसीपी नारायण बरमनी आणि हेमेंद्र पोरवाल म्हणाले, हायटेक टीव्हीएस शोरूममुळे ग्राहकांना कमी वेळेत चांगली सेवा देण्यास अनेकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. आम्ही पण बाईक प्रेमी आहोत. ही नवीन TVSBikeronin 225cc बाईक अतिशय आकर्षक आहे. ती ग्राहकांच्या पसंतीस नक्की उतरेल आणि बाइक्सची बाजारपेठ काबीज करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


यावेळी संचालक राजेंद्र देसाई यांनी या नवीन TVS Bikeronin 225cc बाईकच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती दिली.

यावेळी आणखी एक संचालक विनय बाळीकाई आणि राजेश भोसगी म्हणाले की, लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. आम्ही त्याच आत्मविश्वासाने पुढे जात आहोत. या उत्सवासाठी आमच्याकडे आमचे TVS कंपनीचे वाहन आणि नवीन मॉडेलच्या बाइक उपलब्ध आहेत. TVS वाहन खरेदी करून हा सण साजरा करा असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, एसीपी नारायण बरमनी यांनी हि नवीन बाईक चालवण्याचा आनंद लुटला आणि एक चांगली TVS बाईक विकत घ्या आणि सण साजरा करा असे त्यांनी सांगितले.

Tags:

bikeronin225cc