Belagavi

शिक्षण क्षेत्रात हानगल कुमारस्वामी यांचे मोठे योगदान : गुरुसिद्ध स्वामी

Share

बेळगाव मधील लिंगायत भवन येथे अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या वतीने हानगल कुमारस्वामी जयंती आणि सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हा कार्यक्रम कारंजीमठाचे गुरुसिद्ध स्वामीजी यांच्या सानिध्यात पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी हानगल कुमारस्वामी यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचे स्मरण केले. आपला समाज आज एका टप्प्यावर एकत्रित येण्यामागे हानगल कुमारस्वामी यांची कृपा आहे. ग्रामीण भागात शैक्षणिक संस्था निर्माण करणे, समाज सुधारण्यासाठी काम करणे असे हानगल कुमारस्वामी यांचे विविध पैलू त्यांनी उलगडले.

यावेळी हानगल कुमारस्वामी यांच्यावर आधारित विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महेश पियू कॉलेजचे प्राचार्य एम व्ही भेट यांनी हनगल कुमारस्वामी यांच्या जीवनप्रसवासावर माहितीपर व्याख्यान दिले. गरीब कुटुंबात जन्मलेल्या हानगल कुमारस्वामींनी सुरुवातीला भीक मागितली. मात्र भीक मागूनच का खावे? या पेक्षा आपण शिक्षण घेऊन स्वतः कमवून खाण्यासाठी साक्षर होण्यासाठी त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. अनेक चढउतारांमुळे त्यांनी मठ्धर्म धर्म स्वीकारला आणि सिद्धारूढ आश्रयाला येऊन त्यांनी सामाजिक क्रांतीला सुरुवात केली. दुभंगलेल्या समाजाला एकत्रित आणले. ग्रामीण भागात शिक्षणाविषयी जनजागृती केली, अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. अशापद्धतीचा जीवनप्रवास त्यांनी आपल्या व्याख्यानात उलगडला.

 

यावेळी राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार विजेत्या शिक्षिका सुशीला गुरव यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हाध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद, ज्योती बदामी, गुरुदेव हुलेप्पनवारमठ, सुद्धा पाटील, कमला गणाचारी, एल के गुरव, एम एस हुगार, एस सी गुंडकल, एम वाय मेणसीनकाई, बी बी मठपती, शिवानंद तल्लुर आदींसह समाजातील ज्येष्ठ नागरिक सहभागी होते. विना चिन्ननावर यांनी स्वागत केले. के. रूपा यांनी ईशस्तवन गायिले. संगीता अक्की यांनी प्रास्ताविक तर वि. के. पाटील यांनी आभार मानले.

Tags: