मराठा समाजाचे नेते व भाजप ओबीसी मोर्चाचे कर्नाटक राज्य सचिव किरण जाधव यांनी कर्नाटक मराठा समाज विकास निगमचे अध्यक्ष डॉ. एम. जी. मुळे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शहाजी राजे योजना जारी केल्याबद्दल जाधव यांनी मुळे यांचे आभार मानले.

मराठा समाज विकास निगमचे अध्यक्ष डॉ. एम. जी. मुळे यांची भाजप ओबीसी मोर्चाचे कर्नाटक राज्य सचिव किरण जाधव यांनी सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली. यावेळी उभयतांत मराठा समाजाच्या विकासासाठी पुढील ध्येयधोरणे व समाजाच्या उन्नतीसाठी नवनवीन योजनांवर चर्चा झाली. मराठा समाज स्वावलंबी कसा बनवावा, मराठा समाजाच्या युवकांना उद्योग क्षेत्राकडे वळविण्यासाठी मार्गदर्शन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना डॉ. एम. जी. मुळे म्हणाले की, आपण मराठा समाज एकसंघ करू. समाजाच्या विकासासाठी विविध योजना, उपक्रम राबवू. प्रत्येक समाजबांधवाच्या घरापर्यंत या योजना पोचविण्याचा आपण प्रयत्न करू.
यावेळी शहाजी राजे योजनेबाबत बेळगावमधील मराठा समाजाच्या वतीने किरण जाधव यांनी त्यांचे आभार मानले.


Recent Comments