भारतीय जनता पार्टी, बेळगाव उत्तर मंडळच्या वतीने सेवा सेवा पंधरवडा अभियानाचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बेळगावात आज मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा अभियानात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त बेळगाव भाजप महानगरच्या उत्तर मंडळ शाखेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आज गुरुवारी करण्यात आले होते. यावेळी असंख्य लोकांनी शिबिरात येऊन त्यांची आरोग्य तपासणी करवून घेतली.
खासदार मंगल अंगडी, प्रदेश सचिव उज्वला बडवान्नाचे, प्रदेश प्रवक्ते एम. बी. जिरली, बेळगाव नगरविकास प्राधिकरणाचे (बुडा) अध्यक्ष संजय बेळगावकर, महानगर जिल्हा सरचिटणीस दादागौडा बिरादार, मुरुगेंद्रगौडा पाटील, बेळगाव उत्तर मंडळचे अध्यक्ष विजय कोडगनूर आणि जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. या आरोग्य शिबिर कार्यक्रमास अण्णासाहेब पाटील आदी मान्यवर व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments