ग्रेड–२ सचिव आणि लेखापाल या पदांसाठी तयार केलेली संभाव्य पदोन्नती यादी तत्काळ जाहीर करावी या मागणीसाठी कर्नाटक राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघ आणि सीटूतर्फे आज गुरुवारी बेळगावात जिल्हा पंचायतीसमोर जोरदार घोषणा देत आंदोलन करण्यात आले.
बेळगाव जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायतींच्या व्याप्तीतील २५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या लिपिक, बिल कलेक्टर्सची ज्येष्ठता यादीद्वारे पदोन्नती देण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारी बेळगाव जिल्हा पंचायतीच्या प्रांगणात कर्नाटक राज्य ग्राम पंचायत नोकर संघाने सीटूच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले. यावेळी आपल्या मागण्या मान्य करण्यात याव्यात अशा घोषणा देत लक्ष वेधण्यात आले. (फ्लो)
यावेळी आपल्या आंदोलनासंदर्भात माहिती देताना सीटू जिल्हा प्रधान सचिव जे. एम. जैनेखान म्हणाले, ज्येष्ठता यादीनुसार आपल्याला बढती मिळावी यासाठी आम्ही आज आंदोलन छेडले आहे. ग्रामविकास व पंचायतराज विभागाची यादी बरोबर नसल्याने जिल्हा पंचायतीने ही यादी परत केली आहे. त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या जिल्हा समितीने, जिल्हा पंचायत सीओओ, डीएसओ यांच्या मार्गदर्शनाखाली १४ सप्टेंबर रोजी ग्रेड-२ सचिव आणि लेखापाल या पदांसाठी संभाव्य पदोन्नती यादी तयार केली. १५ सप्टेंबरला ही यादी जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र सदर यादी अद्याप प्रसिद्ध झाली नाही. त्यामुळे हि यादी तातडीने जाहीर करून पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी आपण करत असल्याचे ते म्हणाले. ( )
या आंदोलनात बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.


Recent Comments