Belagavi

बेळगावात बाल न्याय कायद्यावर व्याख्यान कार्यक्रम

Share

बेळगाव शहरात बालविवाह प्रतिबंध कायदा, पॉक्सो व बाल न्याय कायदा या विषयावर विशेष व्याख्यान व जनजागृती कार्यक्रम सोमवारी घेण्यात आला.


जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत बेळगाव, कर्नाटक राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, महिला आणि बालविकास खाते, जिल्हा बाल संरक्षण युनिट आदींच्या सहयोगाने बेळगावातील केएलई संस्थेच्या जी ए पदवीपूर्व कॉलेजच्या एस. एस. बसवनाळ सभागृहात बालविवाह बंदी कायदा आणि पॉक्सो आणि बाल न्याय कायद्यावर विशेष व्याख्यान आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ दिवाणी न्यायाधीश मुरलीमोहन रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला संबोधित करताना वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश मुरलीमोहन रेड्डी म्हणाले की, गेल्या 10 वर्षांपासून, मुलांवर अन्याय करण्याचे गुन्हे वाढले आहेत. समाजातील जबाबदार माणूस म्हणून हे सर्व बघून वाईट वाटते. विविध कारणांमुळे मुलांवर अन्याय होणे आणि हे गुन्हे घडणे दुर्दैवी आहे. लहान मुलांवर होणारे असे गुन्हे रोखण्यासाठी कायदेशीर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी ए पदवीपूर्व कॉलेजचे आर.एस.पाटील होते. महिला व बालविकास खात्याचे उपसंचालक ए. एम. बसवराज, जिल्हा बालकल्याण अधिकारी चंद्रशेखर सुखसारे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा सिस्टर लुर्ड्स मेरी, स्पंदन संस्थेच्या संचालिका डॉ. व्ही सुशीला, बाल संरक्षण अधिकारी जे.टी.लोकेश आदी उपस्थित होते.

Tags:

EVENT SOCIAL