केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांना साखर उद्योग गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पुणे येथे द. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडियाने 18 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या 67 व्या वार्षिक अधिवेशन आणि शुगर एक्स्पो-2022 च्या भव्य समारंभात केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांना ‘साखर उद्योग गौरव पुरस्कार’ प्रदान केला.
अनेक वर्षांपासून साखर उत्पादन क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, राष्ट्रीय साखर संस्थेचे संचालक नरेंद्र मोहन, महाराष्ट्र साखर आयुक्त शेखर गायकवाड, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष एस.एस.गंगावती आदी उपस्थित होते.


Recent Comments