Belagavi

विवेकानंद बहुउद्देशीय सहकारी संस्थेची 10 वी वार्षिक सभा; विध्यार्थी, मान्यवरांचा सत्कार

Share

गुरु विवेकानंद बहुउद्देशीय सहकारी संघाची 10 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक, विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आणि गुणी विद्यार्थ्यांना प्रतिभा पुरस्कार प्रदान समारंभ बेळगावात रविवारी उत्साहात पार पडला.

 

 

गुरु विवेकानंद बहुउद्देशीय सहकारी संस्थेची 10 वी वार्षिक सर्वसाधारण सभा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आणि गुणी विद्यार्थ्यांना प्रतिभा पुरस्कार प्रदान समारंभ बेळगावातील भडकल गल्ली येथील श्री बनशंकरी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. बेळगाव किल्ला येथील रामकृष्ण मिशन आश्रमाचे श्री स्वामी मुक्तिवृत्तानंदजी महाराज यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. आमदार अनिल बेनके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गुरु विवेकानंद बहुउद्देशीय सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नारायण नायक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

 

 

यावेळी पर्यावरणवादी कार्यकर्ते शिवाजी कागणीकर, हॉटेल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विजय सालियान, वैद्यकीय क्षेत्रातील श्रीकांत कोकणी, कारगिल युद्धात सहभागी झालेले ज्येष्ठ योद्धा सिद्दप्पा हुंदरे आदींचा सत्कार करण्यात आला.

 

दरम्यान, पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार ‘इन न्यूज’चे मुख्य संपादक राजशेखर पाटील, सामाजिक सेवा क्षेत्रातील नागरत्ना, सेंद्रिय शेतकरी प्रकाश कुलकर्णी, नीट परीक्षेत देशात चौथा क्रमांक मिळविलेली विद्यार्थिनी रुचा पावशे, राज्यात दहावी परीक्षेत तृतीय क्रमांक मिळविणारी रवीना बसरीमरद, नृत्य स्पर्धेत देशात द्वितीय क्रमांक मिळविलेला पृथ्वीराज होंगरी, भूतरामनहट्टी आदर्श सरकारी शाळा, उत्कृष्ट सेवा संस्था म्हणून ‘नम्म कणसू’ (आमचे स्वप्न) संस्थेचा शाल, फळफळावळे आणि स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला.

यावेळी रामकृष्ण मिशन आश्रमाचे श्री स्वामी मुक्तिवृत्तानंदजी महाराज यांच्यासह मंचावर उपस्थित मान्यवरांनी कर्तृत्ववान आणि प्रतिभावंतांचा सन्मान करून गौरव केला.

Tags:

EVENT RAMKRISHAN MISHAN