अलारवाड येथे जैन बांधवांच्या वतीने 1008 श्री पार्श्वनाथ भगवान मंदिराच्या बस्तीमध्ये दशलक्षण पर्व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून एंजल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष मीना अनिल बेनके उपस्थित होत्या. याप्रसंगी त्यांच्या हस्ते पार्श्वनाथ भगवान यांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.
अलारवाड येथे पालखी सोहळा संपन्न झाल्यावर मीना अनिल बेनके यांनी बेळगावातील मठ गलीतील चिक्कबस्ती येथेही दशलक्षण पालखी कार्यक्रमात देखील हजेरी लावली.
या ठिकाणीही त्यांच्या हस्ते पालखी पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मीना बेनके या पालखी मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या.
याप्रसंगी सर्व महिला मंडळ सदस्यांनी देखील मिरवणुकीत सहभाग घेऊन या पालखी सोहळ्याला रंगत आणली. त्यानंतर अलारवाड येथे महाप्रसादाचे वितरण करण्यात आले याप्रसंगी सर्व सदस्य विश्वस्त तसेच पंचांनी सर्वांना आशीर्वाद दिला.


Recent Comments