Belagavi

हुल्लियानूर गावात हुंडाबळी! मृत विवाहितेला न्याय देण्याची मागणी करत आंदोलन

Share

हुंड्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला असून छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मागील रविवारी हा प्रकार हुल्लियानूर गावात घडला असून सदर विवाहितेला न्याय मिळावा या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी आज पोलीस आयुक्तांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले.

गेल्या रविवारी ककती पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत येणाऱ्या हुल्लियानूर या गावातील रेणुका कोले नामक विवाहितेने पती आणि सासरच्या मंडळींनी केलेल्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या घटनेविरोधात काकती सीपीआय गुरुनाथ आणि एसीपी यांच्याविरोधात हुल्लियानूर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत शहर पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढत कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. याप्रकरणी संबंधित पोलिसांनी सोमवारी दुसऱ्या आरोपीला अटक केली. विवाहितेच्या पतीवर आणि तिच्या सासरच्या मंडळींवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी भाजप नेते मारुती अष्टगी आणि खासदारांचे आप्त सहाय्यकांची गोष्ट ऐकून भाजप नेत्यांच्या गाडीत बसून तेथून काढता पाय घेतला. आपल्या मुलीवर तिच्या पतीने अनेक अत्याचार केले. दिवाळीच्या दरम्यान त्या दोघांच्या वादावर तोडगा काढून पुन्हा तिला सासरी पाठविले. मात्र अखेर त्यांनी तिची हत्या केलीच असा आक्रोश विवाहितेच्या आई वडिलांनी व्यक्त केला.

एप्रिल २०२१ मध्ये हुल्लियानूर येथील रेणुकाचा विवाह भरमाप्पा नायक या व्यक्तीशी झाला होता. लग्नांनंतर अनेक गोष्टींची मागणी करत वारंवार पैशांची मागणी रेणुकाकडे करण्यात येत होती. लग्नात देखील सासरच्या मंडळींच्या मागण्यांनुसार सर्व काही देण्यात आले. मात्र वारंवार पैशांची मागणी करत रेणुकावर अत्याचार केले जायचे. याप्रश्नी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी बैठक घेऊन तोडगा काढला. मात्र हुंड्यासाठी आपल्या मुलीचा बळी घेण्यात आला अशी तक्रार मृत विवाहितेच्या पालकांनी केली आहे. यावेळी मृत रेणुकाच्या नातेवाईकांनी सांगितले, कि रेणुका आणि भरमाप्पा यांच्या लग्नावेळी त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात आल्या होत्या. मात्र रेणुकाला वारंवार पैसे, सोने यासाठी त्रास दिला जायचा. वारंवार पैशाची आणि सोन्याची मागणी केली जायची. हि बाब रेणुकाने आपल्या घरच्यांना सांगितली. यावेळी तडजोड करण्यासाठी बैठक झाली. बैठकीनंतर पुन्हा रेणुका सासरी गेली मात्र तिच्यावरील अन्याय कमी झाले नाहीत. उलट तिची हत्या करून तिचा मृतदेह टांगून खुनाला आत्महत्येचे स्वरूप देण्यात आल्याचा आरोप सदर नातेवाईकाने केला आहे.

मृत विवाहिता रेणुका हिचा खून करून आत्महत्या भरविण्यात आल्याचा आरोप मृत विवाहितेच्या कुटुंबीयांनी केला असून याप्रकरणी काकती पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचीही तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. यानंतर हुल्लीयानूर ग्रामस्थ आणि मृत विवाहितेच्या कुटुंबीयांनी शहर पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली असून या प्रकरणाचा सखोल तपस करून आरोपींना शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Tags:

#basangoudapatilyatnal #belgavisuddi #bjpkarnataka #bsyaddurappa #cmbommaiah #dkshivakumar #inbelgaumnews #indiancongressparty #innewsbelagavi #innewskarnataka #jagadishshattar #kannadanews #karnatakacongress #karnatakanews #laxmihabbalkar #mbpatil #nalinkumarkattil #newslivekannada #Prajvi #praladjoshi #rameshjarakeholi #rameshkatti #satishjarakeholi #shiddaramayya #uttarkarnatakamandi #uttarkarnatakanews