Belagavi

म. वाल्मिकी जयंती आचरणासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

Share

९ ऑक्टोबर रोजी महर्षी वाल्मिकी जयंती भव्य प्रमाणात साजरी करण्याचा निर्धार आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

दरवर्षी मोठ्या उत्साहात वाल्मिकी जयंती साजरी केली जाते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून कोविडमुळे अत्यंत छोट्या प्रमाणात हि जयंती साजरी करण्यात आली. यंदा सर्व समाजाच्या नेत्यांनी महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्याचे ठरविले असून आज अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात चर्चा झाली.

यावेळी वाल्मिकी समाजातील नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. वाल्मिकी जयंती जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात यावी. वाल्मिकी जयंतीच्या दोन दिवस आधी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात यावेत, शहराच्या सर्व प्रवेशद्वारांवर बॅनर आणि कटआउट लावावेत. वाल्मिकी समाजाच्या आरक्षणासाठी समाजातील स्वामीजी उपोषण करत आहेत.

सरकारने यावेळी आरक्षण जाहीर न केल्यास सर्व समाजबांधव स्वामीजींच्या आंदोलनात सहभागी होतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. वाल्मिकी जयंतीदिवशी किल्ला तलावापासून सकाळी ९ वाजता वाल्मिकी प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून त्यानंतर कुमार गंधर्व सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी होणाऱ्या कार्यक्रमाच्या व्यासपीठाला गुंडाप्पा नाईक यांचे नाव देण्याची मागणी समाजातील नेत्यांनी केली.

या बैठकीला मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, समाज कल्याण विभागाचे सहसंचालक उमा सालीगौडर, जिल्हा वाल्मिकी संघटना अध्यक्ष राजशेखर तळवार, दिनेश बागडे, गौतम पाटील, सुरेश गोवण्णावर, मल्लेश चौगुले, यल्लाप्पा नाईक, विजय तळवार, पांडुरंग नाईक, संजय नाईक यासह समाजातील नेते, समाजबांधव आणि अनेक अधिकारी उपस्थित होते.

Tags:

#basangoudapatilyatnal #belgavisuddi #bjpkarnataka #bsyaddurappa #cmbommaiah #dkshivakumar #inbelgaumnews #indiancongressparty #innewsbelagavi #innewskarnataka #jagadishshattar #kannadanews #karnatakacongress #karnatakanews #laxmihabbalkar #mbpatil #nalinkumarkattil #newslivekannada #Prajvi #praladjoshi #rameshjarakeholi #rameshkatti #satishjarakeholi #shiddaramayya #uttarkarnatakamandi #uttarkarnatakanews