हल्लीच्या काळात मोबाईलचा माणसावर होणारा दुष्परिणाम याबाबत बेळगावच्या तरुणांनी शॉर्टफिल्मच्या माध्यमातून संदेश देत एका शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे.
दुर्गा कंबाईन्स, बेळगावद्वारे निर्मित पोस्ट कार्ड आणि मोबाईल या विषयावर आधारित ‘पोस्ट मॅन विरुद्ध मोबाईल मॅन’ या लघुपटाची निर्मिती केली आहे. रविवारी शहरातील लोकमान्य रंगमंदिरात हा लघुपट प्रदर्शित झाला असून युवराज तलवार, प्रकाश मल्लुर, सुरेश गोवण्णवर, डॉ. भीमशी मल्लन्नावर, जीके गोंजाल्वीस, कस्तुरी भावी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन आणि लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले.
या शॉर्टफिल्मबद्दल माहिती देताना सुरेश गोवण्णावर म्हणाले, या शॉर्टफिल्ममधील अभिनेता सतत मोबाईलवर व्यस्त असतो. त्याचे वडील पोस्टमनचे काम करत असतात. आणि आपल्या वडिलांच्या कामाची अभिनेत्याकडून हेटाळणी केली जाते. एकदिवस मोबाईलमुळे अभिनेत्याच्या आयुष्यात एक वेगळे वळण येते.
या वळणातून सावरण्यासाठी अभिनेत्याला कोणत्या परिस्थितीतून जावे लागते यासंदर्भातील हे कथानक आहे. मोबाईलसंदर्भात जनजागृती करणारा एक उत्तम लघुपट बेळगावच्या तरुणांनी बनविला असून या लघुपटासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी लघुपटाचे दिग्दर्शक करेप्पा मल्लुर, अभिनेते सतीश एम जे, अभिनेत्री कीर्ती एच यासह इतर कलाकार आणि मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments