ज्येष्ठ शास्त्रीय संगीत तपस्वी बी. व्ही. कडलास्कर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा एक भाग म्हणून आणि दिग्गज संगीतकार पंडित पलुस्कर यांच्या स्मरणार्थ बेळगावात आज गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

व्हॉईस : बी. व्ही. कडलास्कर बुवा यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा एक भाग म्हणून आणि ज्येष्ठ शास्त्रीय संगीत साधक पंडित पलुस्कर यांच्या स्मरणार्थ समादेवी गल्लीतील स्वरसाधना संगीत विद्यालयाच्या वतीने शहापूर कोरे गल्लीतील सरस्वती वाचनालयात आज, रविवारी गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते या दोन्ही महान साधकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी संगीत गुरू विनायक शिरसाट यांच्यासह बेळगावातील अनेक प्रसिद्ध संगीत कलाकार उपस्थित होते. कुंदगोळचे पं. अशोक नाडीगेर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुरू सेवेसाठी शास्त्रीय व सुगम संगीत व नृत्य संगीताचा कार्यक्रम सादर केला. सीमा कुलकर्णी आणि संगीत विद्वान पं. अशोक नाडीगेर यांनी शास्त्रीय संगीत सादर केले. जितेंद्र साबण्णावर, विशाल मोडक आणि राहुल मंडोळकर यांनी तबल्यावर साथ केली. तर हार्मोनियमवर वामन वागूकर यांनी साथ केली.
याबाबत माहिती देताना आयोजकांनी सांगितले की, सुमारे 50-60 विद्यार्थ्यांनी संगीत सेवा सादर केली. नाट्यसंगीत, भक्तीगीत आणि शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बेळगावचे ज्येष्ठ तबला कलाकार जी. ए. तथा बंडोपंत कुलकर्णी आणि जितेंद्र साबण्णावर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात अनेक संगीत कलाकार, कलाकार आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments