घरावरती स्टील चे पत्रे चढवत असताना हाय होल्टेज विद्युत तारेचा स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू एक जण जखमी झाल्याची घटना आज सूळगा (हिं) येथील वेंगुर्ला रोड येथे घडली.
सदर घटना सोमवारी संध्याकाळी चारच्या सुमारास घडली यामध्ये विनायक कृष्णा कलखांबकर वय वर्षे 24 रा. सुळगा (हिं) तर दुसरा विलास गोपाळ अगसगेकर वय वर्षे 52 रा. बेनकनहळळी या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे.


Recent Comments