घरकामात व्यस्त असणाऱ्या महिलांसाठी सणावाराच्या निमित्ताने विरंगुळा मिळण्यासाठी अनेक परंपरा पूर्वापार चालत आल्या आहेत. परंपरांच्या माध्यमातून महिलांचा व्यायाम व्हावा, या उद्देशाने साजरा केला जाणारा मंगळागौरीचा सण आजही अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात महिलावर्ग साजरा करतात.

बेळगावमधील हा माझा धर्म, पशु बचाव दलातर्फे मंगळागौरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मंगळागौरीसह झिम्मा फुगडी आणि उखाण्यांच्या स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्पर्धा यशस्वी केल्या. एकूण सहा मंगळागौरी महिला संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता यात कंग्राळी येथील संघाला प्रथम क्रमांक पटकाविला.

यास्पर्धेसंदर्भात बोलताना शरद भेकणे आणि निलाजकार या महिलांनी सांगितले, मंगळागौरीचा खेळ हा महिलांच्या मनोरंजनासह व्यायामासाठीही खेळला जातो. आपली संस्कृती विसरून आजच्या तरुणी दुसऱ्या दिशेने पुढे जात असून लोप पावत चाललेली आपली संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी आज या स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.

या स्पर्धेसाठी मनीषा सरदेसाई आणि इंद्रायणी जाधव यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. या कार्यक्रमाचे आयोजन विनायक केसरकर यांनी केले होते.
त्यांना आशिष कोचेरी, सुदर्शन लोहार, अनीस सौदागर, ग्रामपंचायत सदस्य गजानन गव्हाणे, दादासाहेब सूर्यवंशी, कामानी चौगुले यांचे सहकार्य लाभले.
अशोक मनगुतकर, संगीता पाटील, रीना सोनुलकर, ग्रामपंचायत सदस्या सुनिता गव्हाणे, ज्योती गवी ग्रामपंचायत सदस्य गजानन गव्हाणे व दादासाहेब सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले पारितोषिक वितरण पार पडले. कार्यक्रमाची सांगता आशिष कोचेरी यांनी केली


Recent Comments