Belagavi

नाच रे मोरा बेळगावच्या व्हॅक्सिन डेपोत ! मोराचे बेधुंद होऊन मनमोहक नृत्य 

Share

नाच रे मोरा आंब्याच्या वनातहे गाणे ऐकताच सुंदर पिसारा फुलवून देहभान हरपून मनमोहक नृत्य करणाऱ्या मोराची छबी नजरेसमोर येते. बेळगावच्या व्हॅक्सिन डेपोतही आज हीच अनुभूती आली. कुंद पावसाळी वातावरणात मोराने केलेल्या या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

होय, बेळगावातील टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो म्हणजे निसर्गाचे वरदान लाभलेला परिसर. सध्या तर पावसाळ्यामुळे डेपोत जिकडे पाहावे तिकडे केवळ हिरवाईच हिरवाई पसरली आहे. जणू धरतीमाता हिरवी शाल पांघरून पहूडलीय की काय असे वाटावे. या हिरवाईची भुरळ मोराला पडणार नाही तर काय? आज, सोमवारी सकाळी वातावरण ढगाळ आणि कुंद पावसाळी होते. त्या वातावरणात व्हॅक्सिन डेपोमध्ये एक मोर बेधुंदपणे नाचला. मोर काळ्याकुट्ट ढगांकडे पाहतो आणि आपली पिसे उलगडतो आणि गातो अशी कविमनाची कल्पना साकारली. हे पाहणाऱ्या कोणीतरी मोराचा बेधुंदपणे नाचतानाचा व्हिडिओ बनवला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक मोराच्या नृत्याने मंत्रमुग्ध झाले.

Tags: