Belagavi

होसूर बसवण गल्ली मंडळातर्फे सावरकर जीवन दर्शन प्रदर्शन

Share

बेळगाव शहरात गणेशोत्सवानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात येत आहे. गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सावरकरांच्या जीवन चरित्रावरील प्रदर्शनाचे अनावरण आमदार अभय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

होय, काही दिवसांपूर्वी सावरकरांचे छायाचित्र लावण्यास राज्यात काही ठिकाणी मोठा विरोध झाला होता. त्यानंतर भाजपने गणेशोत्सवाच्या मंडपात सावरकरांचे छायाचित्र लावण्याची मोहीम उघडली आहे. बेळगावातही अनेक गणेश मंडळांनी गणेश मंडपात सावरकरांचे छायाचित्र लावले आहे. आता बेळगाव दक्षिण मतदारसंघातील होसूर बसवण गल्ली उत्सव मंडळाने सावरकरांच्या जीवन चरित्राचे प्रदर्शन भरवले आहे. भाजपचे आमदार अभय पाटील यांनी फीत कापून व दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या प्रदर्शनामध्ये वीर सावरकरांच्या स्वातंत्र्यलढ्यातील भूमिकेची माहिती देण्यात आली आहे. स्वातंत्र्यलढ्यातील सहभागापासून ते काळ्या पाण्याच्या शिक्षेपर्यंतच्या दुर्मिळ चित्रांची मांडणी येथे केली आहे. आमदार अभय पाटील यांनी या प्रदर्शनाची पाहणी केली.

सावरकरांचे घर, आनंदाश्रम, अंदमान कारागृह, बेळगावातील हिंडलगा कारागृह यांच्या प्रतिकृती तसेच  सावरकरांनी वापरलेल्या अनेक वस्तूंचे नमुने येथे प्रदर्शनात आहेत. यावेळी बेळगावच्या विविध भागातील लोकांनी येऊन प्रदर्शन पाहिले.

यावेळी सावरकरांच्या जीवनचरित्रावरील प्रदर्शनाचे उद्घाटन करून बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले, वीर सावरकरांचे छायाचित्र लावण्यासाठी परवानगी घेतली पाहिजे असे काहींनी म्हटले होते. पण आम्ही वीर सावरकरांवरील प्रदर्शन भरवले आहे. परवानगी हवी असे जे म्हणतात त्यांनी इथे येऊन बघावे,  सावरकर कोण होते आणि त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान काय होते हे जाणून घ्यावे. मी बेळगावच्या नागरिकांना एक विनंती करतो. सर्वांनी इथे यावे आणि सावरकरांची ही कामगिरी एकदा पहावी. त्यांच्यासारखे देशप्रेमाने आपण भरलेले असले पाहिजे. त्यांच्याप्रमाणे समाजासाठी काय केले पाहिजे याचा विचार करायला हवा. होसूर गणेशोत्सव युवक मंडळाने सावरकरांच्या संघर्षाची माहिती देण्यासाठी हा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, डॉल्बीच्या वापराबाबत आ. अभय पाटील म्हणाले, बेळगावात गणेश विसर्जनाच्या वेळी डॉल्बीच्या वापराबाबत बैठक झाली आहे. कायदेतज्ज्ञ, अधिकारी, मंत्री यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा सखोल आढावा घेतला. डॉल्बी वापरण्यासाठी कोणते नियम पाळावेत, हे निश्चित करण्यात आले आहे. मीही गणेश विसर्जनाच्या वेळी २४ तास इथेच राहणार आहे. यात कोणतीही अडचण नाही असे ते म्हणाले. बाइट

Tags:

#veersavakar exhibhtion belgaum shahapur hosur tilakwadi