दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे गणेशोत्सवानिमित्त बेळगाव शहरातील विविध ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
बेळगाव शहर आणि उपनगरातील विविध गणेश मंडळांकडून आज, रविवारी महाप्रसाद वाटप करण्यात आले. गणेशोत्सवानिमित्त शहरातील कुलकर्णी गल्ली व शेरीगल्ली येथे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी गल्लीतील आणि परिसरातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

या महाप्रसाद वाटपाबद्दल माहिती देताना माजी उपमहापौर सतीश गौरगौंडा म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे याही वेळी कुलकर्णी गल्ली शेरी गल्ली येथे भव्य गणेशोत्सव व महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी 8 ते 10 हजार लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण गणेशोत्सवात 8 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

कंग्राळी बुद्रुक येथील कलमेश्वर नगर येथील गणेशोत्सव मंडळातर्फे आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाप्रसादाची सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी हजारो भाविकांनी रांगा लावून महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी तरुणांनी मोठ्या उत्साहात भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले.


Recent Comments